मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक सर्व्हे समोर येत आहेत. कधी महाविकास आघाडी तर कधी महायुतीच्या पारड्यात सत्तेचा कौल दिला जात आहे. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी बंजखोरांसह भाजपलाही धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात युती होण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळेच या राष्ट्रपती राजवटीमागची खेळी भाजपचीच असल्याचं बोललं जातं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच अप्रत्यक्षपणे भाजपवर राष्ट्रपती राजवटीचं खापर फोडलं होतं. मात्र या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. फडणवीस यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.
२०१९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. “भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नव्हत्या, त्यामुळे सरकार स्थापन करता आलं नाही. त्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं. परंतु त्यांच्या महायुतीकडेही बहुमत नव्हतं. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करू इच्छित आहे. त्यानंतर एक बैठक झाली, ज्यामध्ये मी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.” असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केला आहे.
१० नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, हे त्या वेळी स्पष्ट होतं. त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर सरकार स्थापन करू. . राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन. त्यानंतर भूमिका घेईन. महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं आहे. आम्ही भाजपच्यासोबतच आहोत, असं शरद पवार म्हणाल्याचा दावाही फडणवीसांनी केला. हे सर्व शरद पवार यांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं.”
राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले. त्यामुळे जर पवार म्हणत असतील की राष्ट्रपती राजवट लागू होणं त्यांच्या योजनेचा भाग नव्हता, तर प्रत्यक्षात त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनी आपल्या या वक्तव्याद्वारे २०१९ च्या राष्ट्रपती राजवटीसाठी शरद पवार यांनाच जबाबदार ठरवलं आहे.
मराठा महासंघाचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा |
सूज्ञ मतदार 20 तारखेला उद्वेग व्यक्त करतील |
बारामतीच्या सुभेदारीवरून शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला |
भाजप उमेदवाराला कराडकरांकडे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही : शिवराज मोरे |
आ.शशिकांत शिंदे यांच्या हाती राज्याचे सरकार द्यायचे आहे |
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध |
रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात : गोविंद देवगिरी |
ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का ? : शशिकांत शिंदे |
अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली : जयकुमार गोरे |
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार |
वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध |
रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात : गोविंद देवगिरी |
ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का ? : शशिकांत शिंदे |
अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली : जयकुमार गोरे |
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार |
वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा शहर पोलिसांनी केले 170 गुन्हेगार हद्दपार; 668 सराईतांवर प्रतिबंधक कारवाई |
भाजपने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले : अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर |
बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी : नितीन बानुगडे पाटील |
जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केले ई-मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र |
अमित दादांसाठी प्रचारक पोहोचले शेताच्या बांधावर |