नियम पाळून गणेशोत्सव करा

रवींद्र तेलतुंबडे : बोरगाव पोलीस ठाण्यात गणेश मंडळांची बैठक

by Team Satara Today | published on : 31 August 2024


सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी घेतली. तेलतुंबडे यांनी नियमावलीबाबत माहिती देवून, त्याचे पालन करण्याच्या सर्वांना सूचना दिल्या. तसेच नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बोरगाव पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली. यावेळी गणेशोत्सव काळात आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वापर करायचा नाही, लेझर किरणे पाडू नयेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, उभारण्यात येणार्‍या कमानी याची संबंधित विभागाकडून परवानगी घेण्यात यावी, दोन समाजामध्ये तेढ होईल अशी गाणी लावणी, वक्तव्य करण्यात येऊ नये, लावण्यात येणारे फ्लेक्स यावर ती दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मजकूर किंवा फोटो लावण्यात येऊ नयेत, बांगलादेश, इजराइल, पाकिस्तान येथे घडलेल्या घटना याच्या सोशल मीडियावरती पोस्ट टाकायच्या नाहीत, असा सूचनाही तेलतुंबडे यांनी दिल्या.
गणेशोत्सव काळात सर्व मंडळी हे दिवस-रात्र स्वयंसेवक नेमतील, गावातील सर्व मंडळे एकत्र येऊन गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, ज्या ठिकाणी अंधार आहे अशा ठिकाणी सौरऊर्जा दिवे लावणे यासारखे उपक्रम राबवतील, कोणतेही गणेश मंडळ हे सक्तीने गणेश वर्गणी वसूल करणार नाहीत, दोन मंडळे एकत्रित येतील अशा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत आदींसह विविध सूचना तेलतुंबडे यांनी दिल्या. या बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सुमारे 60 अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात अभया उपक्रमाचा शुभारंभ
पुढील बातमी
डॉ. भारत पाटणकर यांचा 4 रोजी कोल्हापूरमध्ये कार्य गौरव सन्मान

संबंधित बातम्या