अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सिव्हिल कॉलनी, सातारा परिसरात शरद ज्योतीराम शिंदे रा. पाडळी, ता. सातारा आणि संजय कुमार शंकरराव शिंदे रा. मोळाचा ओढा, सातारा हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून जात असताना संतोष विठ्ठल नाईक रा. देगाव ता. सातारा यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 11 सीव्ही 0525 ने शिंदे यांच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये संजय कुमार शिंदे हे जखमी झाले असून नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.



मागील बातमी
मारहाण प्रकरणी दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
नवीन एमआयडीसीत सुमारे 27 हजारांची घरफोडी

संबंधित बातम्या