दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत रॅली होणार आहे. या रॅलीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सीजेआय सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, कोणतीही अनुचित घटना घडेल असे मानण्यास ठोस कारण नाही. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेपर्यंत ठराव मोर्चा थांबवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.
सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा आहे. सर्व पक्ष शांततेने, जबाबदारीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून वागत आहेत, याची प्रशासनाने खात्री करावी.
सीजेपीची प्लान काय आहे?
सोमवारी, सीजेपीने ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत एका निषेध मोर्चाची घोषणा केली. २५ जुलै रोजी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सीजेपीने केला आहे, या आश्वासनांच्या आधारावर सीजेपीने परीक्षेतील अनियमिततेविरोधातील आपले ३६ दिवसांचे आंदोलन मागे घेतले होते. शिक्षक दिनानिमित्त काढण्यात येणारा हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत जाईल.
कोण सहभागी होणार?
CJP ने म्हटले आहे की, नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आणि त्यानंतर फेरपरीक्षा घेतल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवले होते त्यांचे कुटुंबीय या मोर्चाचे नेतृत्व करतील. याशिवाय, जुलै महिन्यातील आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांना कथितरित्या पोलीस अत्याचारांना सामोरे जावे लागले, त्यांचे कुटुंबीयही यात सहभागी होतील.
CJP च्या कार्यसमितीची नुकतीच बैठक झाली, यात हा निर्णय घेण्यात आला. सीजेपीने म्हटले आहे, "आमच्या संयमाला कमजोरी समजण्याची चूक होऊ नये. आमच्या सद्भावनेचा फायदा घेऊन सरकारला देशातील तरुणांचा विश्वासघात करण्याची संधी मिळू नये."
अभिजीत दीपके यांच्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सरन्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी, ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत रॅली
by Team Satara Today | published on : 31 August 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा