सातारा : गिर्यारोहक आणि गिनीज बुक, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप आणि गोविंदा नंद यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन संवाद साधला.
या पाच जणांनी उत्तरखण्ड, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरात येथे पत्रयात्रा करुन बेटी बचाव-बेटी पढाव, स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा अभियान आदी विषयांवर जनजागृती केली आहे. आता ते सातारा येथे आले असून पदयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती करणार आहेत.