सातारा-जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून मिळवला निधी

by Team Satara Today | published on : 12 September 2024


सातारा :  सातारा आणि जावली मतदारसंघातील २२ गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून ४ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत 'मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणे' या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

सातारा तालुक्यातील वेणेखोल, बेंडवाडी, मोरेवाडी, निगुडमाळ, पिलाणी, मस्करवाडी, वावदरे, राकुसलेवाडी, आरगडवाडी, बोपोशी, चाळकेवाडी, साबळेवाडी आणि पेट्री- अनावळे या १३ ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख म्हणजेच एकूण २ कोटी ६० लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

जावली तालुक्यातील कुंभारगणी, पानस, म्हाते बु., केसकरवाडी, वरोशी, बामणोली कसबे, मोहाट, मरडमुरे आणि नांदगणे या ९ ग्रामपंचायतींच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख असा एकूण १ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून इमारत बांधकाम करण्याची मंजूर कामे तात्काळ सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. 

 

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजित पवारांकडून पहिला उमेदवार जाहीर
पुढील बातमी
सातारा-जावलीतील २६ विकासकामांसाठी २ कोटी ३१ लाख मंजूर

संबंधित बातम्या