सातारा : वृद्ध वकिलाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 ते 10 दरम्यान एडवोकेट भीमराव बाबुराव फडतरे रा. मीनाक्षी हॉस्पिटल च्या पाठीमागे, कृष्णा नगर रस्ता, सातारा या वृद्ध वकिलाच्या राहत्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.