महिलेचे आक्षेपार्ह व अश्लिल फोटो, व्हिडीओ प्रसारित करणा-या दोघांना अटक; फलटण शहर पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 06 June 2026


सातारा : सोशल मिडीयावर बनावट ईन्स्टाग्राम आयडी तयार करून महिलेचे आक्षेपार्ह व अश्लिल फोटो/व्हिडीओ प्रसारित करणा-या आरोपीस फलटण शहर पोलीसांनी ठोकल्या बेडया. प्रमोद सनद कांबळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण), सुनिल बाळु मोहिते (वय ३४ वर्षे, रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) अशी याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी यांच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाणेस गु.नो.क्र.१७८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७८,७९,३५६(२), सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) ६७,६७ (ए) प्रमाणे अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. दाखल गुन्हयातील आरोपी याने दुस-या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड घेऊन ईन्स्टाग्रामवर बनावट वेगवेगळे अकाऊंट तयार करून सोशल मिडीयाद्वारे महिलेचे मॉर्फ केलेले विविध अश्लिल आक्षेपार्ह फोटो अश्लिल मॅसेज तयार करून सहा महिन्यापासून वेगवेगळ्या ईन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फेसबुक व व्हॉटसअॅपद्वारे प्रसारित करून पिडीत महिलेची व पतीची बदनामी करून नाहक त्रास देत होता. 

या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असता दाखल गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी तपास पथक तयार करून या गुन्हयाचा तांत्रिक तपास करून आरोपीने वापरलेले मोबाईल क्रमांक प्राप्त केले.  बनावट इन्स्टाग्राम आयडी याचे अवलोकन केले असता त्यामधून प्रमोद सनद कांबळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण) यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा सुनिल बाळु मोहिते (वय ३४ वर्षे, रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) याच्या मदतीने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

आरोपी सुनिल बाळु मोहिते हा व्ही आय कंपनीचा सीम कार्ड विक्रेता असून त्याने आरोपी प्रमोद सनद कांबळे याला दुस-या व्यक्तीच्या नावाने त्यांचे परस्पर सीमकार्ड देऊन ते चालु करून आरोपी प्रमोद सनद कांबळे याने ते सीमकार्ड गुन्हयात वापरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हयात वापरलेले ४ मोबाईल हँडसेट, ६ सीमकार्ड असे २३,५०० रूपयेचा मुद्देमाल जप्त केला असून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली कडुकर,  पविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहायक पोलीस निरीक्षक मितू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, पोलीस अंमलदार बापूराव धायगुडे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे, निखील गायकवाड, गणेश अवघडे, जयदीप यादव, अतुल बडे यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये बेकायदेशीर शस्त्रांवर पोलिसांचा धडक छापा; चार संशयितांवर गुन्हा
पुढील बातमी
गुरुवार पेठ परिसरात घर दुरुस्तीच्या वादातून मारहाण; जातिवाचक अपमान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या