सातारा बसस्थानक परिसरात रात्री उशिरापर्यंत व्यवसाय; पान सेंटर चालकांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 05 June 2026


सातारा : शहरातील सेव्हन स्टार परिसरात निर्धारित वेळेनंतर पान सेंटर सुरू ठेवणाऱ्या दोघांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

४ जून रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ओम साई पान सेंटरवर तपासणी केली असता दुकान सुरू असल्याचे आढळून आले. संबंधितांकडे उशिरापर्यंत व्यवसाय चालविण्याची अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अमोल महादेव चव्हाण (वय २५) आणि एका १८ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मोहरे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडलेली महिला अद्याप बेपत्ता; पोलिसांकडून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू
पुढील बातमी
घरात घुसून महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या