सातारा : यवतेश्वरकडे जाणाऱ्या रोडवर दि १५ रोजी पॉवर हाऊससमोर झालेल्या अपघातात अपर्णा संजय आवटे (वय ४२, रा. बालाजी नगर समर्थ मंदिर जवळ मंगळवार पेठ, सातारा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याची खबर सातारा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शाहूपुरी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहोड करत आहेत.
पॉवर हाऊससमोर झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
by Team Satara Today | published on : 18 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा