कराड : रहेबर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पाडळी (केसे) येथील १० वी १२ वी त उज्जल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कराड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल कदम व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शितल गाडगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला,
आजच्या विद्यार्थ्यांनी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा व चांगले शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्वल कसे होईल यासाठी प्रयत्न करावे,
रहेबर सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष वसीम शेख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेऊन विद्यार्थ्याचे मनोबल वाढवण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे, रहेबर सोशल फाउंडेशनला यावेळी अमोल कदम यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल कदम यांचा सत्कार माजी सरपंच हाशम मुजावर व शितल गाडगे यांचा सत्कार गावच्या सरपंच आशामा मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला,
पत्रकार विश्र्वास मोहिते यांनी प्रास्ताविक व आभार मानले यावेळी सरपंच उपसरपंच व सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, कराड - पाटण तालुक्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोशिएशनचे सर्व संचालक उपस्थित होते.