सातारा : महिला बचत गटाच्या उत्पादनांना फाउंडेशनचे व्यासपीठ हे हक्काचे आहे. या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने ज्योतिर्मय फाउंडेशनचे सुरू असलेले प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.
ज्योर्तिमय फाउंडेशन सातारा यांच्या वतीने आयोजित ज्योतिर्मय महोत्सव 2025 या भव्य महिला बचत गट विक्री प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी वैशालीताई शिंदे, फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुवर्णाताई पाटील,अंजु मणेर, रीना भणगे व ज्योर्तिमय परिवाराचे सर्व महिला संयोजक सदस्य उपस्थित होत्या. यावेळी वैशाली शिंदे, सुवर्णादेवी पाटील, नरेंद्र पाटील, आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या महोत्सवामध्ये तब्बल 200 स्टॉलचा सहभाग आहे.
5 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत होत आहे. अध्यक्षा सौ. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली 12 वर्षांहून अधिक काळ साताऱ्यात उद्योजक महिलांना या महोत्सवाद्वारे व्यासपीठ मिळत आहे. या व्यासपीठाचे कौतुक शशिकांत शिंदे यांनी मनापासून केले. तसेच प्रदर्शनातील काही स्टॉल्सला भेटी देऊन महिलाबचत गटांच्या उत्पादनांचे मनापासून कौतुक केले.ज्योर्तिमय परिवाराच्यावतीने सुवर्णाताई पाटील यांनी शिंदे दांपत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले, महिला या स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध असतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्यानंतर अर्थाजनाच्या दृष्टीने सुद्धा त्या कुटुंबाला सक्षम बनवू शकतात. सुवर्णाताई पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्योर्तिमय महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या दशकभरापासून सुरू ठेवलेला हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे .ही बचत गटाची उत्पादने जागतिक पातळीवरपोहोचावी या दृष्टीने धोरणांची रचना झाली पाहिजे असे ते म्हणाले.
विविध महिला बचत गटांची उत्पादने, हस्तकला, खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती सजावटीच्या वस्तू यांचे आकर्षक स्टॉल्स यामध्ये मांडण्यात आले असून नागरिकांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दर्शवला आहे.ज्योतिर्लिंग महोत्सव हा येथील जिल्हा परिषद या मैदानावर तब्बल चार दिवस सुरू राहणार आहे. तसेच या निमित्ताने वेगवेगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सातारकरांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सुवर्णाताई पाटील यांनी केले आहे.