03:46pm | Aug 21, 2024 |
नवी दिल्ली : आयसीसी वनडे रँकिंगवरून मागच्या आठवड्यात बराच वादंग झाला होता. बाबर आझमचं नाव वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. दरम्यान आयसीसीने मागच्या आठवड्यात एकही वनडे सामना झालेला नसताना नवी वनडे रँकिंग जाहीर केली आहे. वनडे क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. टॉप 5 फलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. वनडे रँकिंगमध्ये अजूनही बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. त्याची रेटिंग 824 इतकी आहे. बाबर आझमने मागच्या आठ महिन्यात एकही वनडे सामना खेळलेला नाही. असं असूनही पहिल्या स्थानावर आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यात रोहित शर्माने बॅक टू बॅक दोन अर्धशतकं झळकावली होती. त्याचा त्याला फायदा झाला आहे. रोहित शर्माची रेटिंग 765 इतकी असून बाबर आझमला धोबीपछाड देऊ शकतो. पण या वर्षात टीम इंडियाचा एकही वनडे सामना नाही. त्यामुळे हे गणित कठीण आहे.
तिसऱ्या स्थानावर शुबमन गिल असून त्याची वनडे रेटिंग 763 इतकी आहे. रोहित आणि शुबमन यांच्यात फक्त दोन गुणांचा फरक आहे. त्यामुळे वनडे सामन्यात ही चुरस आणखी तगडी होईल. विराट कोहली आयर्लंडच्या हॅरी टॅक्टरसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. या दोघांची वनडे रेटिंग 746 आहे. दुसरीकडे, या वर्षात जास्त वनडे सामने नसल्याने क्रमावारीत फारसा बदल होणार नाही हे निश्चित आहे. सर्वच संघांचा कसोटी आणि टी20 मालिकेवर लक्ष आहे. आजपासून बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात कसोटी क्रमवारीत उलथापालथ होऊ शकते.
दुसरीकडे, वुमन्स वनडे रँकिंगमध्ये स्मृती मंधानाला फायदा झाला आहे. तिच्या क्रमवारीत एका क्रमाने सुधारणा झाली असून तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. स्मृती मंधानाची रेटिंग 738 इतकी आहे. तर हरमनप्रीत कौर या क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. इंग्लंडची नॅटली स्किवर ब्रंट 783 गुणांसह पहिल्या, तर दक्षिण अफ्रिकेची लॉरा वॉल्वार्ड्ट 756 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्मात असलेली श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू 727 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी असून तिचे 704 गुण आहेत.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |