महाबळेश्वर : द बाईक शांती व्हिला या पंचतारांकित हॉटेल परिसरात भंगार गोळा करणाऱ्या मागासवर्गीय महिलांवर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण झालेल्या महिलांची नावे सोनाली राहुल गोळे सपना सागर गोसावी अश्विनी विनोद वाघमारे अनिता दिलीप जाधव सर्व राहणार सिद्धनाथ वाडी वाई.
घटनेनंतर संबंधित महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तक्रार नोंदवण्याऐवजी त्यांच्यावरच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा दबाव आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांनी केला आहे.”जर या महिलांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही थेट महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करू,” असा इशारा किरण शिंदे सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या घोषणा आणि दुसरीकडे थेट गरिबांवर अन्याय… या घटनेने स्थानिक प्रशासनाची आणि पोलिसांची भूमिकाच प्रश्नचिन्हात आली आहे.
या प्रकरणात काय कारवाई होते, आणि या महिलांना न्याय मिळतो का, याकडे आता संपूर्ण महाबळेश्वर सह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.