छत्रपती शिवरायांचा सर्वात उंच पुतळा सातारा जिल्ह्यात उभारण्याची परवानगी मिळावी

जाखणगावचे शेतकरी पुत्र संजय भगत यांची मागणी

by Team Satara Today | published on : 30 August 2024


सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचा जगातील सर्वात उंच पुतळा अथवा स्फूर्तीस्थान उभारण्याची सातारा जिल्ह्यामध्ये परवानगी मिळावी, अशी मागणी जाखणगाव, तालुका खटाव येथील संजय बाबासाहेब भगत यांनी केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहे. अशा युगपुरुषाचा जागतिक दर्जाचा जगातील सर्वात उंच पुतळा सातारा जिल्ह्यात उभारण्यास परवानगी मिळावी, तो परिसर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती स्थान म्हणून विकसित केला जावा, सातारा या नावाऐवजी नाव बदलून राजधानी सातारा असा प्रस्ताव तयार केला जावा. त्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी द्यावी, या तिन्ही विषयासंदर्भात येत्या 10 दिवसाच्या कोणतीही तारीख जाहीर करून त्या दिवशी सातारा जिल्ह्यात विशेष ग्रामसभा बोलावून हे तीन ठराव ग्रामसभेत मंजूर करून घ्यावेत, अशी मागणी भगत यांनी करत शिवस्फूर्ती स्थान हे पर्यटनदृष्ट्या आणि प्रेरणा देण्याच्या दृष्टिकोनातून त्याची आखणी करावी. याबाबत राज्य शासनाने गांभीर्य बाळगावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील आठही मदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
पुढील बातमी
सातारा, सांगली जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार तडीपार

संबंधित बातम्या