सातारा भाजपातर्फे आ. अबू आझमी यांचा निषेध

फोटोला शेण फासून, जोडे मारून, लावली आग

by Team Satara Today | published on : 06 March 2025


सातारा : सातारा भाजपातर्फे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी याच्या फोटोला शेण फासण्यात आले, तसेच जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा शत्रू, धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून हत्या करणार्‍या, हिंदुद्वेष्टया औरंगजेबाचे कौतुक केले, त्याचे उदात्तीकरण केले याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे सातार्‍यात पोवई नाका येथे अबू आझमी याच्या फोटोला शेण फासण्यात आले, जोडे मारण्यात आले आणि फोटो पेटविण्यात आला.

अबू आझमी याचे विधानसभा सत्रातून विलंबन केले असले तरी ते पुरेसे नाही. त्यांची आमदार पदावरून हकालपट्टी करावी. एवढेच नव्हे तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या अबू आझमी बरोबरच त्याच्या सर्व पिलावळीला उत्तर प्रदेशात हाकलून द्यावे. त्या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित हिशोब ठेवून कार्यक्रम करण्यात येईल, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली.

यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, मनीषा पांडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, अनु. जाती मोर्चा प्रदेश सचिव शैलेंद्र कांबळे, अनु जमाती मोर्चा प्रदेश सचिव सदाशिव नाईक, माजी नगरसेवक किशोर पंडित, चंदन घोडके, युवराज मोरकर, अश्विनी हुबळीकर, रोहिणी क्षीरसागर, संगीता जाधव, विजय नायक, अविनाश खर्शीकर, अमित काळे, संदीप वायदंडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे, रोहित सावंत, जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी सावंत, रोहित किर्दत, विक्रम बोराटे, सनी साबळे, तेजस कदम, प्रशांत जाधव, रविकिरण पोळ, गौरव मोरे, यशोवर्धन मुतालिक, जिल्हा चिटणीस श्रीधर हादगे, अक्षय चांगण, सोशल मीडिया जिल्हा संयोजक प्रथमेश इनामदार, जिल्हा सहसंयोजक प्रथमेश मोरे, जिल्हा सहसंयोजक युवा वॉरिअर श्रेयस शिंदे, अनिकेत टिंगरे, रणजीत खाडे, सूरज जाधव आणि पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयत्याने मारहाण प्रकरणी समीर कच्छी सह दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
उंब्रज पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

संबंधित बातम्या