नवी दिल्ली : भारताच्या मोठ्या शत्रुचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. वाँटेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. तो लश्कर-ए-तैयबाचा (LeT) डेप्युटी चीफ आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता. रिपोर्ट्सनुसार, मक्कीचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय. वर्ष 2023 मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं. त्या अंतर्गत मक्कीची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय हाफिज अब्दुल रहमान मक्कीच्या प्रवासावर आणि शस्त्रांवर प्रतिबंध घालण्यात आले होते.
आज शुक्रवारी ह्दयविकाराच्या झटक्याने हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू झाला. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा नातेवाईक आणि प्रतिबंधित जमात-उद-दावा डेप्युटी चीफ होता. जमात-उद-दावानुसार, अब्दुल रहमान मक्की मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. लाहोरच्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर डायबिटीजसाठी त्याच्यावर उपचार सुरु होते. JUD च्या एका दहशतवाद्याने PTI ला मक्कीच्या मृत्यूची माहिती दिली. आज सकाळी अब्दुल रहमान मक्कीला ह्दयविकाराचा झटका आला, त्यात रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं.
JUD प्रमुख हाफिज सईदचा नातेवाईक असलेल्या मक्कीला पाकिस्तानच्या एका दहशतवाद विरोधी न्यायालयाने 2020 साली टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिले तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. माहितीनुसार, टेरर फंडिंग केसमध्ये शिक्षा झाल्यानंतर मक्कीने आपल्या कारवाया कमी केल्या होत्या. पाकिस्तान मुताहिदा मुस्लिम लीगने (PMML) एका स्टेटमेंटमध्ये मक्की पाकिस्तानी विचारधारेचा समर्थक होता असं म्हटलं आहे.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |