या वीकेंडला तुमचा काय प्लॅन आहे? कुठं फिरायला जाणार आहात की घरच्यांसोबत चहा-भजी खात पावसाचा आनंद लुटणार आहात? जर तुम्ही श्रावणा महिन्याच्या या सुंदर मौसमात घरच्या लोकांसोबत वेळ घालवायचं ठरवलं असेल, तर हा वेळ आणखी खास बनवण्यासाठी ओटीटीवर आलेली ही नवीन सस्पेन्स थ्रिलर पाहण्याचं नक्की ठरवा. कारण या छोट्या बजेटच्या क्राईम थ्रिलरनं थरकाप उडवणारं आहे.
2 तास 2 मिनिटांची ही फिल्म ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. कथा सुरू होऊन अवघ्या 10 मिनिटांतच प्रेक्षक विचार करू लागतात, "पुढे काय होणार?" फक्त 5 कोटी रुपयांत बनलेल्या या चित्रपटाचा शेवटचा सीन पाहण्यासाठी प्रेक्षक टीव्हीसमोर खिळून बसतात. सरळसोपी वाटणारी ही कथा शेवटच्या 20 मिनिटांत इतकी गुंतागुंतीची होते की, पाहणाऱ्यांच्या तोंडून आपोआपच निघतं – "आता पुढे काय?"
शाही कबीर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेली ही फिल्म म्हणजे ‘रोंथ’, जी विनीत जैन, रतीश अंबट, रेंजिथ ईव्हीएम आणि जोजो जोस यांनी निर्मित केली आहे. ही एक मल्याळम क्राईम थ्रिलर फिल्म आहे, जी ओटीटीवर हिंदीतही उपलब्ध आहे.
‘रोंथ’ या शब्दाचा अर्थ म्हणजे गस्त (patrolling). ही एक अशी थ्रिलर कथा आहे, जी एका रात्री घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे.
‘रोंथ’ ही एक सस्पेन्स आणि इन्व्हेस्टिगेशन थ्रिलर फिल्म आहे. ही कथा दोन पोलिसांभोवती फिरते – एक वरिष्ठ आणि एक कनिष्ठ पोलिस अधिकारी. हे दोघं एका रात्री गस्तीसाठी बाहेर पडतात. जसजशी रात्र पुढे सरकत जाते, तसतसे हे दोघं एका गंभीर आणि विचित्र पेचात सापडतात.
गस्तीदरम्यान, हे दोघं एका मद्यधुंद वाहनचालकाला पकडून त्याच्यावर दंड करतात. याच वेळी एक कुटुंब आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवते. त्यानंतर जे काही घडतं, ते डोकंच फिरवणारं आहे.
या चित्रपटातील सस्पेन्स, सतत घडणाऱ्या घटना आणि शेवटचा ट्विस्ट हे या चित्रपटाची मुख्य ताकद आहे. रात्रीचे दृश्य फारच सुंदरपणे चित्रीत करण्यात आले आहेत. अनिल जॉनसन यांचं पार्श्वसंगीत थ्रिलचा अनुभव अधिक तीव्र करतं. वीकेंडला ओटीटीवर पाहण्यासाठी ‘रोंथ’ ही एक अप्रतिम निवड आहे.
ही फिल्म हॉटस्टार ओटीटीवर उपलब्ध आहे. IMDb वर या चित्रपटाला 7.4 रेटिंग मिळाली आहे. लेखक व दिग्दर्शक शाही कबीर यांचा हा सिनेमा गेल्या महिन्यात 13 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. सुमारे 5 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या मलयाळम सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 9 कोटींचा व्यवसाय केला.