सातारा : शहरातील एमआयडीसी ते धनगरवाडी बिरोबा मंदिर रस्त्यावर संशयास्पद बोलेरो मॅक्स पिकअप वाहन शहर पोलिसांना आढळून आले.
या वाहनाच्या मालकीहक्कबाबत पोलिसांनी विचारला केली. मात्र, अद्याप पर्यंत कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याने हे वाहन कुठून तरी चोरी केले असून लबाडीने आणले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला, याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुहास जगन्नाथ कदम यांनी फिर्याद दिली असून चंद्रकांत विठ्ठल जाधव (वय २८ रा. जांब खुर्द, ता..कोरेगाव) आणि प्रणव अरुण पवार (रा. किन्हई,ता. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.