टोल वाचविण्यासाठी अवजड वाहनांचा कराड शहरातील अंतर्गत रस्त्यांचा सर्रास वापर; वाहतूक कोंडीत भर

by Team Satara Today | published on : 22 July 2026


कराड : उंब्रज येथील टोलनाका टाळण्यासाठी तसेच महामार्गावरील पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी अवजड वाहनचालकांकडून कराड शहरातील अंतर्गत रस्त्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचे चित्र आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी अनेक वाहने शहरातील मुख्य रस्त्यांवरून ‘शॉर्टकट’ घेत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असून अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.

कराड पोलीस ठाणे ते दत्त चौक हा शहरातील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या परिसरात विविध शैक्षणिक संकुले, बाजारपेठा आणि व्यावसायिक आस्थापना असल्याने दिवसभर नागरिक, विद्यार्थी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच सिग्नल, पोलिसांची तपासणी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहनचालक अंतर्गत पेठांमधील अरुंद मार्गांचा वापर करीत आहेत. परिणामी, शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त भार पडत आहे.

कोल्हापूर, तसेच सातारा दिशेने येणारी काही अवजड वाहने उंब्रजकडे जाण्यासाठी मलकापूरमार्गे बैल बाजार परिसरातून कराड शहरात प्रवेश करतात. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाचगणी शहरासह परिसरात वीज खंडित; मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे कोलमडली, दूरध्वनी व इंटरनेट सेवा ठप्प
पुढील बातमी
शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; एनडीएसोबत युती करण्याबाबतच्या चर्चांना उधाण

संबंधित बातम्या