सातारा : तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपारीचे आदेश असतानाही त्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शाहरुख नौशाद खान (वय 30, रा. सोमवार पेठ, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार पेठ येथे तो आला असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर दि. 17 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास पोलीस हवालदार दळवी करीत आहेत.