वृध्द महिलेला मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात गुन्हा

सातारा : वृध्द महिलेला मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील मंगळवार पेठेत चुलीमुळे भिंत काळी झाली आहे, असे म्हटल्याच्या कारणावरुन वृध्द महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी  ताराबाई विष्णू पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून प्रकाश चव्हाण आणि अक्षय चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही, रा. मंगळवार पेठ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दि. 15 जानेवारी रोजी ही घटना घडली.



मागील बातमी
विद्युत मोटार आणि केबलची चोरी
पुढील बातमी
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या