04:33pm | Nov 14, 2024 |
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. अशात पुण्यात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात आहेत. पुण्यातील मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले आहेत. याच भेटीगाठीं दरम्यान अनेकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत अनेकांनी तुतारी फुंकली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांना पुरतं घेरण्याची तयारी केल्याचं दिसतंय. पुणे वडगाव शेरी मतदार संघात अजित पवार गटाला धक्का बसला आहे. माजी नगरसेवक रेखा टिंगरे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात 3 वेळा नगरसेवक होत्या. त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केलाय.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक रेखा टिंगरे यांचा अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून धनकवडीचे माजी सरपंच बापूसाहेब धनकवडे यांचे नातू समीर धनकवडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केलाय. हडपसर विधानसभा मतदारसंघातून दिलीप तुपे स्थायी समितीचे माजी चेअरमन आणि अनिल तुपे साधना बँक माजी चेअर यांनी भाजपामधून शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
अजित पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईचे अजित पवार गटाचे पदाधिकारी, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विलास माने, दिनकरराव तावडे, विजय देसाई यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खेड तालुका अद्यक्ष धीरज साबळे यांनी देखील आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात धक्का बसला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम भोकरे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. श्याम भोकरे हे श्रीवर्धन मतदार संघातील पदाधिकारी आणि सुनील तटकरेंचे निकटवर्तीय आहेत. रायगड जिल्ह्यात गटबाजी निर्माण झाली. गट बाजूला कंटाळून आम्ही शरद पवार गटात प्रवेश केला. परवा मसाळामध्ये शरद पवारांची बैठक आहे. त्यावेळी देखील अनेक प्रवेश होणार आहेत. सुनील तटकरे प्रत्येकाला वचन देतात परंतु ते निभवत नाहीत. सगळे त्यांच्या घरात पद आहे ते स्वतः मंत्री आमदार, मुलगी आमदार, मुलगा आमदार पुतण्या आमदार भावा आमदार घराणेशाही सुरू आहे. एवढी पद घरात असल्यावर विकास होणारच आहे. आज आम्ही 50 लोकांनी प्रवेश केला, असं श्याम भोकरे म्हणालेत.
पर्वती विधानसभा मतदार संघांच्या उमेदवार अश्विनी कदम शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदी बागेत आल्या आहेत. शरद पवार आज पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे, बापूसाहेब पठारे यांनी आज सकाळी त्यांची भेट घेतली.
मराठा महासंघाचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा |
सूज्ञ मतदार 20 तारखेला उद्वेग व्यक्त करतील |
बारामतीच्या सुभेदारीवरून शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला |
भाजप उमेदवाराला कराडकरांकडे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही : शिवराज मोरे |
आ.शशिकांत शिंदे यांच्या हाती राज्याचे सरकार द्यायचे आहे |
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध |
रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात : गोविंद देवगिरी |
ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का ? : शशिकांत शिंदे |
अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली : जयकुमार गोरे |
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार |
वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध |
रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात : गोविंद देवगिरी |
ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का ? : शशिकांत शिंदे |
अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली : जयकुमार गोरे |
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार |
वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा शहर पोलिसांनी केले 170 गुन्हेगार हद्दपार; 668 सराईतांवर प्रतिबंधक कारवाई |
भाजपने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले : अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर |
बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी : नितीन बानुगडे पाटील |
जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केले ई-मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र |
अमित दादांसाठी प्रचारक पोहोचले शेताच्या बांधावर |