सातारा : गोडोली बसस्थानकाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ७ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे यांनी ही कारवाई केली. अभिजीत नलवडे, सचिन सावंत आणि मनोज पवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.