अभिनय क्षेत्रात आपल्या कलेसह अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय सुरू केल्याचे दिसले आहे. ज्यामध्ये महेश मांजरेकर, अनघा अतुल, हार्दिक जोशी, सई ताम्हणकर, प्रसाद लिमये, अक्षया देवधर यांसारख्या अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत हॉटेल, कपड्यांचे व्यवसाय सुरू केले आहे. आणि त्यांना या व्यवसायात यश देखील मिळाले आहे. या यादीत आता छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. ती म्हणजे रेश्मा शिंदे.
मराठी मालिका ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय असल्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने रेश्मा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता सध्या ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे रेश्माने आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री आता उद्योजिका झाली आहे. यासंदर्भात रेश्माने स्वत: पोस्ट शेअर करत सर्वांना आनंदाची माहिती दिली आहे. याशिवाय तिने आपल्या नव्या व्यवसायाची झलक देखील सर्वांना दाखवली आहे.
रेश्माने पालमोनास या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करून पुण्यात कोथरुड येते स्वत:चे ज्वेलरी शॉप उघडले आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने स्वतः ही बातमी चाहत्यांना सांगितली आहे. रेश्माने ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगला पांढर्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घालून वेस्टर्न लूक केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्री पोस्ट शेअर करता चाहत्यांचे आभार मानले आहेत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अभिनयाच्या प्रवासात तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलंत. आता एक नवीन प्रवास तुमच्या साक्षीने सुरू करते आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठिशी असू दे. उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी पालमोनास या ब्रँडबरोबर पार्टनरशिप करून हा व्यवसाय सुरू केला आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार” असे अभिनेत्रीने लिहिले आहे. ही पोस्ट पाहून अभिनेत्रीने चाहत्यांची पुन्हा एकदा मने जिंकली आहेत.
दरम्यान, रेश्मा शिंदेने या शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. चाहत्यांसह अभिनेत्रीला मराठी कलाकार देखील शुभेच्छा देताना दिसत आहेत. ज्यामध्ये श्रेया बुगडे, शिवानी बावकर, अभिज्ञा भावे, अनघा अतुल, ऋजुता देशमुख, अपूर्वा नेमळेकर, शिवानी सोनार, अश्विनी कासार यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |