अतित गावच्या हद्दीत महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोन्ही दरवाजे तुटले

by Team Satara Today | published on : 13 September 2026


सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अतित (ता. जि. सातारा) गावच्या हद्दीत भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने कारच्या उजव्या बाजूचे दोन्ही दरवाजे चक्काचूर झाले. शनिवारी (दि. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आंध्र प्रदेशातील प्रत्युष एम. धरमय्या हे टाटा नेक्सॉन कारमधून सातारा ते कराड दिशेने जात होते. त्यावेळी तमिळनाडूतील ट्रकचालक आरोकीयासामी अमालोरपवनाथन हा ट्रक भरधाव वेगाने चालवत होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने कारच्या उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. धडकेमुळे कारचे दोन्ही दरवाजे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले.
याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यातील सेव्हन स्टार इमारतीसमोरील भाजी मंडईत मोबाईल चोरट्यास नागरिकांकडून चोप; गुन्हा दाखल

संबंधित बातम्या