हॉटेलमध्ये आढळला वृद्धाचा जळालेला मृतदेह

सातारा : विसावा नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये वृद्धाचा जळालेला मृतदेह आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विसावा नाका येथील जनसेवा हॉटेलमध्ये आनंदराव सखाराम मोरे (वय 70, रा. पेट्री ता.सातारा) यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना दि. 3 फेब्रुवारी रोजी समोर आली. याप्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


मागील बातमी
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता
पुढील बातमी
कामाठीपुरा येथे युवकाची आत्महत्या

संबंधित बातम्या