जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने मोफत एच.पी.व्ही लसीकरण मोहिम केंद्र सरकारने राबवावी : श्रीरंग काटेकर

सातारा : राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महिलांचे योगदान महत्वपूर्ण ठरत आहे. स्पर्धेच्या युगात पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर राहून राष्ट्राच्या प्रगतीला मोठा हातभार लावत आहेत. त्यांच्या योगदान बरोबर त्यांच्या निरोगी आरोग्याची काळजी बाबतही खरे तर उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी महिलांच्या आरोग्यविषयक काही धोरणात्मक निर्णय सरकारने घेणे अपेक्षित आहे. यामध्ये भारतीय महिलांमध्ये निर्माण होणारे विविध आजार विशेषतः गर्भपिशवी मुखाचा कर्करोगाची वाढते प्रमाण हे देशाच्या दृष्टीने खूप चिंताजनक असून, त्याबाबत राष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने विचार मंथन होणे गरजेचे आहे. देशात या आजाराने त्रस्त असणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. याबाबत महिला वर्गामध्ये स्वतःच्या आरोग्य विषयाची उदासीनता बरोबरच वेळेत उपचार न केल्याने या आजाराने असंख्य महिला मुत्युमुखी पङतात. 21 व्या शतकातील खरी तर ही एक मोठी शोकांतिका आहे. याबाबत राज्य व केंद्र सरकारने महिलांच्या आरोग्य विषयी धोरणात्मक निर्णय राष्ट्रीय स्तरावर घेऊन, देशातील सर्व महिलांना मोफत एच.पी.व्ही लसीकरण मोहीम एक राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो, यानिमित्ताने गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सातारा यांचा विशेष लेख.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्राच्या आरोग्य विषयक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी संपूर्ण देशपातळीवर केल्याने, अनेक आजार व रोगांवर मात करणे देशाला शक्य झाले. काळानुसार बदलणारे आजार त्यावर उपचार पद्धतीमध्ये संशोधकांनी केलेले नाविन्यपूर्ण संशोधन कामी आले. आजही अनेक आजारावर प्रभावी उपचार पद्धतीचे संशोधन केले जात आहे, अनेक दुर्धर आजारावर संशोधकानी शोधलेले औषधे व लसीकरणामुळे देशातील नागरिकांचे जीवनमान वाढले आहे. सध्या संपूर्ण विश्वाला कर्करोगाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. विशेषत: महिलांची जीवनशैलीतील बदलामुळे कर्करोगाचा धोका अधिक निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस या आजाराला असंख्य महिला बळी पड़त असून, ही एक राष्ट्रीय समस्या निर्माण झाली आहे. सध्या या प्रश्नाबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय सेवा क्षेञात नाविन्यपूर्ण संशोधन सुरु आहे. कर्करोग विशेषता महिलांच्या पिशवीमुखाची समस्या बाबत महिलांमध्ये जनजागृती काळाची गरज बनली आहे. महिलांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण पाहता विविध औषधे बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

संध्या भारतातील स्त्रियांमधील गर्भपिशवी मुखाचा कर्करोग वेगाने फैलाव होत असून, या समस्येवर मात करणे काळाची गरज आहे. भारतात सन 2022 मध्येजवळपास 127500 स्त्रियांना गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाचे निदान झाले. यामध्ये 80 हजार स्त्रियांचा मृत्यू पावल्याचे धक्कादायक अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाहणीपथकाला आढळून आले आहे. हा आजार हयू‌मन पॅपिलोमा व्हायरस एच.पी.व्ही या विषाणूच्या दीर्घकालीन संसर्गामुळे  होत असल्याचे, संशोधकाचे मत आहे. गर्भपिशवी मुखाचा 70 ते 80 टक्के कर्करोग हा एच.पी.व्ही विविध प्रकारचे अतिधोकादायक असणाऱ्या जातीमु‌ळे होतो. या गर्भपिशवी मुखाचा कर्करोग प्रतिबंधक करण्यासाठी देशांतर्गत आरोग्य सेवेच्या माध्यमातून या रोगाचे गांभीर्य स्त्रियांपर्यत पोहोचवणे आवश्यक आहे. सध्या देशात कर्करोग या आजाराबाबत असंख्य समज-गैरसमज आहेत. कर्करोग झालेली व्यक्ती ही मरणच पावणार असे गृहीत धरले जाते, परंतु 21 व्या शतकात वैद्‌यकीय सेवा क्षेत्रात मोठी क्रांती झाल्याने, तिसर्‍या व चौथ्या स्टेजवर असणाऱ्या कर्करोग ही पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे  वैद्यकीय शास्त्रातील उपचार पद्धतीने सिद्ध केले आहे. त्यामुळे या आजाराबाबत भीती न बाळगता योग्य उपचार हाच एकमेव पर्याय आहे. देशात याबाबत सर्व स्तरावर प्रसार प्रचाराबरोबरच एच.पी.व्ही लसीकरण मोहीम राष्ट्रीय स्तरावर हाती घेणे आवश्यक आहे. यामध्ये केंद्र त राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेऊन एक राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेऊन, देशातील स्त्रियांना मोफत लसीकरण मोहीम हाती घेतली पाहिजे. महिलांचे प्रश्न आणि समस्या याबाबत जागरूक असणारे केंद्र व राज्य सरकारने ही मोहीम हाती घेतली तर, या आजाराची लागण होणाऱ्या असंख्य महिला वर्गाचे प्राण वाचतील. ज्या प्रमाणे देशात यापूर्वी पोलिओ लसीकरण मोहीम संपूर्ण देशपातळीवर राबवून पोलिओचे उच्चाटन केले, त्याचप्रमाणे गर्भपिशवी मुखाचा महिलांना होणारा कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी ठिकठिकाणी मोफत शिबिरे व लसीकरण मोहिमा हाती घेतली पाहिजे. विशेषत: महाराष्ट्र राज्य सरकारने ‘माझी लाङकी बहीण’ या योजनेमार्फत कोट्‌यावधी रुपयांची तरतूद करून महिलांना दरमहा पंधराशे रुपये नियोजन केले आहे. त्याच धरतीवर राज्य व केंद्र सरकारने महिलांसाठी गर्भपिशवी मुखाचा कर्करोग प्रतिबंधासाठी मोफत लसीकरण मोहीम हाती घ्यावी. जेणेकरून देशातील महिलांचे कर्करोगांपासून मुक्तता होऊन त्यांची जीवन हे सुखकारक होईल.

गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाची निर्मूलन मोहीम केंद्र व राज्य सरकारने हाती घेऊन ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी, शालेय व महावि‌द्यालय स्तरावरील मुलीमध्ये याबाबत प्रबोधन जनजागृती व मोफत लसीकरण मोहीम हाती घेणे काळाची गरज आहे. सध्या बाजारपेठेत या लसीची असणारी किंमत ही सर्वसामान्य स्त्रियाना परवडणार नाही. केंद्र व राज्य सरकारने याबाबत विशेष तरतूद करून, मोफत लसीकरणाची मोहीम सपूर्ण देशपातळीवर राबवावी. तसेच हयुमन पेपिलोमाव्हायरस (HPV) लस HPV संसर्ग आणि त्यामुळे होऊ शकणारे कर्करोग टाळण्यासाठी वापरली जाते. 9 ते 12 वयोगटातील लैंगिक क्रिया सुरू होण्यापूर्वी लस दिली जाते तेव्हा ती सर्वांत प्रभावी असते.
सिक्कीम सरकारने महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशील असून, त्यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन महिलांसाठी गर्भपिशवी मुखाचा कर्करोगासाठी शासन स्तरावर मोफत लसीकरण मोहीम विशेषत: शालेय स्तरावर किशोरवयीन मुलीना या आजाराचे समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी त्यानी वार्षिक बजेटमध्ये कोट्‌यावधी रुपयाची तरतूद करून देशात एच.पी.व्ही मोफत लसीकरणाचा बहुमान मिळाला आहे.
न्यूमोनियापासून बालकाचे संरक्षण करण्यासाठी देण्यात येणारे न्यूमोकोकोक्ल कान्जुॅगेट व्हॅक्सिन, हे बालकांना मोफत दिले जात असल्याने देशातील असंख्य बालकांना या आजारापासून संरक्षण मिळाले आहे. विविध लसीकरण केंद्र सरकारने मोफत देत असल्याने देशांतर्गत निर्माण होणारे विविध आजारावर यामुळे मात करणे शक्य झाले आहे. 21 व्या शतकात महिलेचे निरोगी आरोग्य चळवळ ही अधिक व्यापक होऊन महिलांसाठी सर्व आजारांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून हाती घ्यावे.
पुढील बातमी
माहुलीच्या महिला सरपंचांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

संबंधित बातम्या