छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या काळापासून सिंहगड किल्ल्याच्या रक्षणासाठी राबणार्या गडाच्या पायथ्याच्या कल्याण मोरदरीजवळील घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील सुभेदार बहिर्जी नाईक रामोशी वस्तीसाठी स्वातंत्र्यानंतरही रस्ता नसल्याने संतप्त रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार करताच प्रशासनाने रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना हवेली तालुका तहसीलदारांना दिल्या. याबाबत हवेली तालुका तहसीलदार किरण सुरवसे यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 138 अंतर्गत संबंधित जागा मालकांना नोटीस बजावली आहे.
तहसीलदारांच्या उपस्थित दि. 9 नोव्हेंबर रस्त्याची समक्ष पाहणी करण्यात येणार आहे. याबाबत हवेली तालुका तहसीलदार किरण सुरवसे म्हणाले, शनिवारी रस्त्याची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाही करण्यात येणार आहे.
रस्त्याअभावी बहिर्जी नाईक रामोशी वस्तीतील शेकडो रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यकर्ते, प्रशासन वर्षानुवर्षे केवळ आश्वासन देत आहेत. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.
याबाबत निवडणूक अधिकारी व पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना घेरा सिंहगडचे उपसरपंच गणेश गोफणे व रहिवाशांनी निवेदन दिले. उपसरपंच गणेश गोफणे म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही वस्तीत प्रशासनाने जाण्यासाठी रस्ताच केला नाही. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही दखल घेतली नाही. रस्त्याच्या जागेची पाहणी करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.
बारमाही रस्ता नसल्याने रामोशी वस्तीतील रहिवाशांना शेताच्या बांधावरून तसेच बिकट पायवाटेच्या काटेरी झुडपातून, ओढे-नाले ओलांडून दररोज ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ओढ्याला पूर येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. गंभीर आजारी रुग्णांचे वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी जात आहेत. हवेली तालुका तहसीलदारांनी यापूर्वी पाणंद रस्त्याच्या पाहणीसाठी अनेकदा नोटीस बजावल्या. मात्र, प्रत्यक्षात पाहणीसाठी तहसीलदार व महसूल अधिकारी एकदाही फिरकले नाहीत. आता मात्र तहसीलदार समक्ष पाहणी करणार असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत! |
संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा |
जिल्ह्यात कार्तिकी एकादशी धार्मिक वातावरणात साजरी |
सातारा-जावलीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित : आ. शिवेंद्रराजे |
आ. शिवेंद्रराजेंच्या विजयात परळी भागाचा सिंहाचा वाट असेल |
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शेतकर्याचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
शिवसेना सोडून जाणार्या गद्दारांना भीक घालत नाही |
कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे स्वप्न : आ. पृथ्वीराज चव्हाण |
आयात उमेदवार लादल्यामुळेच शिवसेनेला जय महाराष्ट्र |
मुंबईस्थित सातारा-जावलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध |
मतदान दिवस आणि मतदान पूर्व दिवस प्रिंट मिडीयामध्ये देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शेतकर्याचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
शिवसेना सोडून जाणार्या गद्दारांना भीक घालत नाही |
कराडमध्ये आयटी हब उभारून रोजगार उपलब्ध करण्याचे माझे स्वप्न : आ. पृथ्वीराज चव्हाण |
आयात उमेदवार लादल्यामुळेच शिवसेनेला जय महाराष्ट्र |
मुंबईस्थित सातारा-जावलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध |
मतदान दिवस आणि मतदान पूर्व दिवस प्रिंट मिडीयामध्ये देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
छत्रपतींच्या वारसदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे |
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल |
निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? |
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |