रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावातील घटना

by Team Satara Today | published on : 22 October 2025


महाबळेश्वर :  महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट या गावातील रहिवाशी राघू जानू कदम या शेतकऱ्याचा रानगव्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला.

राघू कदम हे सकाळी शेतीची कामे करण्यासाठी शेताकडे गेले होते. दुपार नंतर गावातील अन्य लोक शेतात जात असताना राघू कदम वाटेत पडलेले दिसले. गव्याने जबर हल्ला केल्याने गव्याचे शिंग छाती फाडून निघालेले दिसून आले. जोरदार धडक दिल्याने राघू कदम हे जागीच ठार झाले होते. गव्याचा हल्ला एवढा प्रचंड होता हो राघू कदम यांच्या शरीराच्या चिधड्या झाल्या आहेत.ही घटना गावात समजताच विभागातील लोकांचा जनसमुदाय घटनास्थळी जमा झाला. त्वरित वन विभागाला व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

रानगवे, रान डुक्कर व तरसामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावेळी अनेकांनी रानगव्यांची संख्या जास्त झाल्याने शेतीचे नुकसान होत आहे अशी तक्रार केली व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले असल्याची माहिती दिली. आजच्या घटनेमुळे गावातील तसेच विभागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात प्रचंड उत्साहात पारंपारिक लक्ष्मी पूजन; फटाक्यांच्या आतषबाजीने उजळला आसमंत
पुढील बातमी
शाहूपुरीतील संकल्प कॉलनींतर्गत रस्त्याचा प्रश्न मार्गी; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रयत्न

संबंधित बातम्या