भीषण कार अपघातात दोन महिला ठार; पाच गंभीर

पाचवड जवळील महामार्गावर घडली दुर्दैवी घटना

by Team Satara Today | published on : 09 March 2025


सातारा : पाचवड, ता. वाई येथील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या कारच्या भीषण अपघातामध्ये दोन महिला जागीच ठार झाल्या असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, सातारा बाजू कडून पुण्याकडे निघालेली इनोव्हा कार क्र. एमएच 11 बीके 1567 या कारने महामार्गावरच नादुरुस्त असल्याने उभ्या असलेल्या कंटेनर क्र. एमएच 14 जेएल 2473 ला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारमध्ये बसलेल्या जहीरा समीर शेख वय 38 रा. शनिवार पेठ, सातारा व सलमा इरफान मोमीन वय 41 रा. सांगली या गंभीर जखमी झाल्या. अधिक उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तसेच या अपघातामध्ये सहप्रवासी असलेले पाच जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांनाही अधिक उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीसह पत्नीची आत्महत्या
पुढील बातमी
बारावीची ऑनलाईन बोर्ड परीक्षाही गैरप्रकारमुक्त

संबंधित बातम्या