'या' तेलामुळे रक्ताच्या नसा कधीच बंद पडणार नाही

हार्ट अटॅकचा धोका राहील दूर, FSSAI ने सांगितलं कस वापराल?

by Team Satara Today | published on : 11 October 2025


दिवाळीचा फराळ म्हटलं की, चकली, करंज्या, शंकरपाळ्या, शेव, चिवडा असे पदार्थ आलेच. अन् हे पदार्थ तेलाशिवाय विचारच करु शकत नाही. दिवाळीनंतर अनेकांना हृदयाच्या आरोग्याशी संबंधित आजारांचा त्रास होतो. अशावेळी दिवाळीच्या सुरुवातीलाच FSSAI ने दिलेल्या पद्धतीप्रमाणे तेलाचा वापर करुन फराळ बनवा. म्हणजे फराळाचा मनमुराद आनंद लुटता येतो. 

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर करडी नजर ठेवणाऱ्या देशातील सर्वात मोठी संस्था FSSAI नुसार, अनेक लोक खाद्यपदार्थाच्या तेलांवर लक्ष ठेवत नाही. किती तेलाचा वापर करायला हवं, कोणतं तेल आरोग्यासाठी सर्वात चांगलं आहे, कोणत्या तेलात अन्नपदार्थ तयार करावेत. तसेच चुकीच्या पद्धतीने तेल शरीरात गेल्यास ते विष बनू शकतं अशावेळी काय टाळाल. पाहा A to Z माहिती. 

तेलाची मर्यादा 

रोजच्या जेवणात आपण तेलाचा वापर किती करत आहोत, याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. जेवण बनवताना तेलाचा काय वापर केला जातो तसेच महिन्याला आपल्याला किती तेल लागतं याची नोंद ठेवावी. जास्त तेलामुळे फक्त वजन वाढत असं नाही तर त्यामुळे इतर आरोग्याच्या समस्या देखील डोकं वर करतात. 

पॅकेज तेलाचा वापर करा 

सुटं तेल वापरणं टाळा. स्वच्छतेच्या बाबतीत सुटं तेलं तेवढं खरं उतरत नाही. यामुळे पॅकेज तेलाचाच वापर करावा. रिफाइंड, सूर्यफूलाचे, सोयाबीन आणि तिळाच्या तेलाचा वापर आरोग्यासाठी सर्वोत्तम असतो. चुकीच्या पद्धतीच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो आणि हॉर्ट अटॅकचा धोका टळतो. 

पदार्थ तळताना तेल किती गरम करावे?

प्रत्येक तेलाचा एक स्मोक पॉइंट असतो. एका निश्चित तापमानानंतर तेल जळायला लागतं आणि त्यातील पोषक तत्व कमी होतात. हे तेल शरीरासाठी घातक असतं. दिवाळीत फराळ तळत असताना या चुका अनेकदा होण्याची शक्यता असते. अशावेळी तेल योग्य प्रमाणातील आचेवर गरम करावे आणि पदार्थ तळून घ्यावा. 

अधिक तेलाचा वापर टाळा 

शक्य झाल्यास दिवाळीत अधिक तेलाचा वापर टाळा. यासाठी तेलकट पदार्थ न बनवता ते बेक करा किंवा कमी तेलाचा वापर करा. दिवाळीत हाय ब्लड प्रेशर, हॉर्ट अटॅक, फॅटी लिवरची समस्या असणाऱ्या लोकांना धोका अधिक असतो. त्यामुळे दिवाळीत फराळ बनवताना आणि खाताना सावध राहा. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांची यादी तात्काळ तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
सासपडे येथील शाळकरी मुलीचा खूनच; संशयितांच्या घरावर हल्लाबोल; गावात तणावाचे वातावरण

संबंधित बातम्या