फलटण : फलटण-पंढरपूर रस्त्यावरील बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत गुरुवारी पहाटे भरधाव वेगात असणार्या एका कंटेनरने कारला धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तिघे ठार झाले. मृतांमध्ये खंडाळ्यातील खेड बुद्रुक व पाडेगाव तसेच खटावमधील वेटणे येथील युवकाचा समावेश आहे. या तिन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर संशयित कंटेनरचालक पसार झाला आहे.
सागर रामचंद्र चौरे (वय 34, रा. पाडेगाव ता. खंडाळा), भाऊसो आप्पा जमदाडे (45, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा) व नीलेश चंद्रकांत शिर्के (40, रा. वेटणे, ता. खटाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कारमालक सूरज संतोष खरात (रा. पाडेगाव) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, भाऊसो जमदाडे व नीलेश शिर्के यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचा विजापूर येथे एक ट्रक बंद पडला होता. हा ट्रक दुरुस्त करून तो लोणंदमध्ये आणायचा होता. यासाठी नीलेश व भाऊसो यांनी मॅकेनिक सागर चौरे यांना सोबत घेतले होते. हे सर्वजण सूरज खरात यांची चार दिवसांपूर्वी घेतलेली नवी कोरी कार घेऊन विजापूरला गेले होते. विजापूरमधील बंद पडलेल्या ट्रकचे काम झाल्यानंतर दिवाळी सणासाठी हे सर्व दि. 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री विजापूरहून निघाले होते. त्यांची कार पहाटे 4.30 च्या सुमारास बरड गावच्या हद्दीत आली असता या कारला फलटण- पंढरपूर रोडलगत बागेवाडी पेट्रोल पंपाच्या जवळ फलटणहून पंढरपूरकडे जाणार्या कंटेनरने (क्रमांक एम. एच. 46. सीएल 9651) समोरा-समोर धडक दिली.
कंटेनरने दिलेल्या धडकेत कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर कंटेनरचालक पसार झाला. परंतु, बरड गावच्या पुढे आल्यानंतर राजुरी गावच्या हद्दीत या कंटेनरचा रेडिएटर फुटल्याने चालक कंटेनर तिथेच सोडून पसार झाला. या भीषण अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |