लिंगायत समाजाची ‘रुद्रभूमी’ विकसित करण्‍यास प्राधान्‍य : शिवेंद्रसिंहराजे भोसले

by Team Satara Today | published on : 03 March 2025


सातारा : येथील लिंगायत समाजाची स्‍मशानभूमी ‘रुद्रभूमी’ विकसित करण्‍यासाठी प्राधान्‍य दिले जाईल, अशी ग्‍वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच दिली. महात्‍मा बसवेश्‍‍वर सामाजिक सेवा मंडळ आणि लिंगायत समाजाच्‍या शिष्‍टमंडळाच्‍या वतीने मंत्री शिवेंद्रसिंहराजेंची नुकतीच भेट घेण्‍यात आली, तसेच यावेळी रुद्रभूमीच्‍या विकासाबाबत प्रकाश गवळी यांच्‍या नेतृत्‍वाखाली निवेदन सादर करण्‍यात आले.

यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी त्वरित संबंधित खात्‍यांच्‍या अधिकाऱ्यांना योग्‍य त्‍या सूचना देऊन लिंगायत समाजाला कायमस्वरूपी सर्व सोयीसुविधांनियुक्‍त अशी स्‍मशानभूमी विकसित करून देण्‍याची ग्‍वाही दिली. दरम्‍यान, सातारा पालिकेच्‍या अभियंत्‍यांनीही मंत्री महोदयांच्‍या आदेशानुसार रुद्रभूमीची प्रत्‍यक्ष पाहणी करून, पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

याप्रसंगी महात्‍मा बसवेश्‍‍वर सामाजिक सेवा मंडळाचे संस्‍थापक अध्‍यक्ष सागर कस्‍तुरे, श्रीनिवास कामळे, रुद्राप्‍पा चिंचकर, संजय बेदाडे, नंदशेठ गुरसाळे, सुभाष ताटे, महादेव सरडे, महादेव मेंडीगिरी, राजेंद्र आरळेकर, राजेंद्र बारवडे, किरण लखापती, रमेश भांदुर्गे, सुरेश कळसकर, संजय आटकेकर, विजय साखरे, अविनाश सरडे, प्रतीक बाजारे, हणमंतराव कोठावळे आदी लिंगायत समाज बांधव उपस्‍थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शरद पवार सहकुटुंब 5 दिवस महाबळेश्वरात मुक्कामी
पुढील बातमी
भारतीय सैन्याने माना दुर्घटनेत ४६ जणांना वाचवले

संबंधित बातम्या