महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जीवनधारा फायनान्स, शाहूनगर, गोडोली, सातारा येथे सातारा शहर परिसरात राहणाऱ्या महिलेस शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याप्रकरणी राजेंद्र सोपान यादव आणि शाहूराज राजेंद्र यादव दोघेही रा. शाहूनगर, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.



मागील बातमी
शाहूनगर मध्ये चैन स्नॅचिंग
पुढील बातमी
बुलेटस्वारांचे नियमबाह्य फटाके आता बंद

संबंधित बातम्या