सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तामजाई नगर येथील एका दुकानाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास संतोष परशुराम जगताप (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 430 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.