सातारा : दुचाकीच्या धडकेवरून झालेल्या वादातून चौघांनी एका तरुणाच्या घरावर हल्ला चढविला. लोखंडी रॉडने मारहाण, दगडफेक आणि तोडफोड करून घरासह दोन दुचाकींचे नुकसान करण्यात आले. कर्मवीरनगर, अमरलक्ष्मी, कोडोली येथे गुरुवारी (दि. 29) रात्री हा प्रकार घडला.
सिद्धेश कुमार अरविंद चौबे (रा. कर्मवीरनगर) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम खरात, सनी जाधव आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. त्यांनी सिद्धेश यांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाद मिटविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या आई, भावाला आणि चुलत भावालाही मारहाण करण्यात आली. राम खरात याने स्टूल चुलत भावाच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. त्यानंतर संशयितांनी घरावर दगडफेक केली. दोन मोटारसायकली, दरवाजा आणि खिडक्यांची तोडफोड केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.
दुचाकीच्या धडकेचा वाद घरापर्यंत; अमरलक्ष्मी, कोडोली येथे दगडफेक करीत कुटुंबावर हल्ला
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा