सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोबाईल काढून घेवून काठीने मारहाण केल्याप्रकरणी निरंजन पिसे, विशाल निकम, सुरज, अण्णा सांगलीकर, अविनाश जाधव यांच्या विरुध्द अतुल संतनाथ कबाडे (वय 37, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 30 नोव्हेबर रोजी गुरुवार पेठेत घडली आहे.