स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी गाडे विरुद्ध 893 पानांचे दोषारोपपत्र

by Team Satara Today | published on : 18 April 2025


पुणे : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणाचा तपास ५२ दिवसात पुर्ण करून पुणे पोलिसांनी तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तांत्रिक गोष्टींवर अत्यंत चांगल्या पद्धतीने हा तपास पुर्ण केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविला जाणार असून, तिही प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न पोलिसांचे आहेत.

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी गावी निघालेल्या २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) याने पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गावी जाण्यास आलेल्या तरुणीला गाडेने ताई म्हणून संवाद साधत तिचा विश्वास संपादन केला. नंतर तिला वाहक असल्याचे सांगत तिला मुक्कामी गाडीत बसण्यास भाग पाडले. तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला होता. बलात्काराच्या घटनेनंतर गाडे फरार झाला होता. तरुणीने देखील तक्रार देण्यास तीन ते चार तास उशिर केला होता. त्यामुळे आरोपी तोपर्यंत मुळ गावी पोहचला होता. तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीची ओळख पटवली होती. मात्र, त्याचा शोध घेण्यास ३ दिवसांचा कालावधी लागला होता. अथक शोध मोहिमेनंतर त्याला गुनाट गावातील शेतातून पकडण्यात आले होते.

पोलिसांनी याप्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पंचनामा, कपड्यांवर डाग तसेच दत्तात्रयचे शुज, कपडे जप्त केले होते. वैद्यकीय तपासणी, डीएनएची देखील तपासणी केली. त्यासोबतच घटना बसमधून आवाज बाहेर येतो किंवा नाही, याची शास्त्रोक्त पडताळणी तसेच फॉरेन्सिक अहवाल आणि इतर महत्त्वाच्या पुराव्यांवर आधारित तपास करण्यात आला. एकूण ८९३ पानी दोषारोपत्र तयार करत शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. मात्र, अद्यापही दत्तात्रय गाडेचा मोबाईल मात्र, पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

दत्तात्रय गाडे व तरुणीच्या केसांचा डीएनए मॅच

दत्तात्रय गाडेच्या शर्टचे तुटलेले अर्धे बटन सापडले

बसमधून तरुणीचा आवाज येतो का हेही तपासले

पिडीत तरुणीने आरोपीला ओळखले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा : आरोग्यमंत्री आबिटकर
पुढील बातमी
बीडमध्ये वकील महिलेला अमानुष मारहाण

संबंधित बातम्या