गुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी पियुष जाधव यांची अमेरिकेतील एलॉन मस्क यांचे “टेस्ला” कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्नशिपसाठी निवड

by Team Satara Today | published on : 19 August 2025


सातारा : गुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी चि. पियुष अरुण जाधव हा अमेरिकेतील केलीफोर्नियाच्या स्टेट युनिवर्सिटी मध्ये एम. एस. (कॉम्पुटर सायन्स) सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे द्वितीय वर्षात उच्च शिक्षण घेत आहे. नुकतीच त्याची अमेरिकेतील एलॉन मस्क यांचे “टेस्ला” कंपनीत आर ॲन्ड डी. विभागात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. 

चि. पियुष अरुण जाधव हा सातारा शाहूनगर येथील गुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. त्याला  एस. एस. सी बोर्डात ९६ टक्के व एच. एस. सी बोर्डात ९० टक्के गुण मिळाले होते. तसेच पुणे येथील व्ही. आय. टी ॲटोनॉमस  इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी कॉम्पुटर सायन्स मध्ये बी. टेक सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी विशेष प्राविण्यासह मिळवलेली आहे.

करंडी, ता. जि. सातारा येथील व सध्या शाहूनगर, सातारा येथे राहणारे ॲड. अरुण वसंतराव जाधव यांचा तो चिरंजीव आहे. चि. पियुष अरुण जाधव याच्या यशाबद्दल गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सत्कार केला. यावेळी अॅड. ऐश्वर्या चोरगे, माध्यामिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे उपस्थित होते. 

चि. पियुष अरुण जाधव याला पुढील वाटचालीसाठी आनंद गुरव, अर्जुन चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल, हरिदास साळुंखे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी शुभेच्छा दिल्या.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आर्थिक लाभाच्या आमिषाने सहाजणांची सुमारे दीड कोटींची फसवणूक
पुढील बातमी
राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

संबंधित बातम्या