सातारा : दोरगेवाडी, ता. माण येथील नवनाथ क्रीडा मंडळ दोरगेवाडी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या महिला संघाने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात शंभु महादेव वरकुटे म्हसवड या संघावर मात केली, तर उपांत्य फेरीत सांगलीच्या भारती विद्यापीठ संघावर मात केली.
या संघात राष्ट्रीय खेळाडू गार्गी साखरे, श्रुती बेंद्रे, वैष्णवी खळदकर, वैष्णवी इनामदार व राज्यस्तरीय खेळाडू अनुजा दळवी, सिद्धी साळवी, एंजल कदम, स्नेहल जाधव, पूजा कोकरे, अनुष्का येवले, सई कचरे, मनीषा गायकवाड, अदिती ढवळे, ईश्वरी केंजळे, प्रणाली जाधव, प्रतिष्का शिंदे यांचा समावेश होता.
या संघास राष्ट्रीय प्रशिक्षक शशिकांत यादव यांचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव माने, सचिव प्रसाद उथळे, खजिनदार सुरेश पाटील, पांडुरंग महाडिक, अप्पा कुलकर्णी, नारायणदास दोशी, विश्वास गोसावी, निलेश महाडिक, प्रणव लेवे, संजय मांडके, राष्ट्रीय प्रशिक्षक समीर थोरात यांनी तसेच शिवाजी उदय मंडळाचे सर्व पदाधिकारी, पालक प्रशिक्षक आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.