सातारा : अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील सिटी पोलीस लाईन येथे निखिल हणमंत गायकवाड (रा. शनिवार पेठ, सातारा) हा संशयितरित्या आपले अस्तित्व, चेहरा लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने बसलेला आढळून आला. पुढील तपास महिला पोलीस नाईक गोळे करीत आहेत.
सिटी पोलीस लाईन येथे संशयितरित्या अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा