सातारा : सातारा पोलिसांनी तडीपार केलेला मनोज नामदेव पवार हा गुन्हेगार पुन्हा सातारा शहराच्या हद्दीत आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 1 ऑक्टोबर रोजी साडेदहा वाजता गीते बिल्डिंग रविवार पेठ येथे तो आढळून आला. पवार याला सातारा प्रांत यांनी 23 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केले होते. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीशिवाय तो पुन्हा सातारा शहराच्या हद्दीत आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. इरफान यासीन मुलाणी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.