दौलतगनर येथे तब्बल 5 लाखांची घरफोडी

by Team Satara Today | published on : 12 June 2025


सातारा : सातार्‍यातील दौलतगनर येथील बंद घर चोरट्यांनी टार्गेट करुन 13 तोळे वजनाचे तब्बल 5 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. घरफोडीच्या या घटनेने दौलतनगर हादरले असून वकील महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुध्द तक्रार दिली आहे.

ऍड. पूनम चंद्रशेखर ईनामदार (वय 66, रा. दौलतनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरीची ही घटना दि. 5 जून ते 10 जून या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी बंद घराचा सेफ्टी लोखंडी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. ईनामदार कुटुंबियांनी किचन कट्ट्याच्या खाली स्टीलच्या डब्यामध्ये सोन्या-चांदीचे ठेवले होते. तो सर्व ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

चोरी झालेल्या ऐवजांमध्ये 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची 5 ग्रॅम वजनाची अंगठी, 30 हजाराचे 6 ग्रॅमचे कानातले, 1 लाखाचे 30 ग्रॅमचे कंगन, 40 हजाराचे 15 ग्रॅमचे पदक, 30 हजाराचे 12 ग्रॅमचे पदक, 1 लाखाच्या 4 तोळे वजनाच्या 9 अंगठ्या, 50 हजाराचे 2 तोळ्याचे कानातले जोड, रोख 25 हजार रुपये, चांदीचे ब्रेसलेट, दोन महागडी घड्याळे, 200 रुपयांची नाणी असा 4 लाख 77 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी करुन पंचनामा केला. ठसे तज्ञ तसेच इतर एक्स्पर्ट बोलावून तपासणी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यात एकाचा निर्घृण खून
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या