सातारा : मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी राजवाडा येथील भाजी मंडईत किरकोळ कारणावरून चंद्रकांत भगवान निगडकर रा. सोमवार पेठ, सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच संतोष दत्तात्रय निगडकर, सागर संदीप निगडकर, गणेश संतोष निगडकर, यश शेखर निगडकर, कांताबाई दत्तात्रय निगडकर, कमल संतोष निगडकर, दीपक दत्तात्रय निगडकर आणि उषा दीपक निगडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.
दरम्यान, संतोष दत्तात्रय निगडकर यांनी दिलेल्या तक्रारीत ऐश्वर्या शशिकांत निगडकर, तनुजा शशिकांत निगडकर, शिवराज उमाकांत निगडकर, ओम उमाकांत निगडकर, राजश्री चंद्रकांत निगडकर, चंद्रकांत भगवान निगडकर, विद्या उमाकांत निगडकर आणि शितल शशिकांत निगडकर यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.