सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेतजमीनीमध्ये पर्यायी मार्ग काढण्यासाठी शासकीय अधिकारी तेथे असताना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी स्वप्नील नामदेव लोखंडे (वय 32, रा. वनवासवाडी ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 4 ऑगस्ट रोजी घडली आहे. संशयिताने लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.