क्षेत्रमाहुली येथे चारचाकीची दुचाकीला धडक; एक जण जखमी, चारचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 22 January 2026


सातारा : कोरेगाव-सातारा रोडवर क्षेत्रमाहुली येथील कृष्णा नदी पुलाजवळ दि.  20 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चार चाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली यामध्ये एक जण जखमी झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी केवल युवराज देवकर (वय २५ रा. आझाद चौक,कोरेगाव) हा त्याच्या दाजींना घेऊन जात असताना टोयाटो इटॉस (एम.एच. ११ सी.जी. १८८०) ने जोराची धडक दिली. यामध्ये फिर्यादीचे दाजी रोहित हे जखमी झाले. त्यानंतर चारचाकी चालकाने दुचाकी चालकाला शिवीगाळ केली. जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. 

धडक बसल्याने रोहित हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तसेच दुचाकीचे नुकसान देखील झाले याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील साबळेवाडी फाट्यावर कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात ; पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य -अजित पवार

संबंधित बातम्या