सातारा : सातारा शहरातील एका झेरॉक्स सेंटरवर प्रतिलिपी अधिकार अधिनियमांतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार पेठ, सातारा येथील शितल झेरॉक्स सेंटर दुकानावर प्रतिलिपी अधिकार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सुरेश भस्मे (वय 48, रा. सोमवार पेठ) यांच्या विरुध्द रामजित महादेव गुप्ता (वय 52, रा. उल्हासनगर, मुंबई) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शितल झेरॉक्स या दुकानामध्ये दुकानदाराने ऍडोब फोटोशॉप हे विनापरवाना बेकायदेशीर डाउनलोड करुन स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याने स्मार्ट सोल्यूशन या कंपनीचे स्वामित्व हक्काचे उल्लंघन केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.