सातारा : शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडूदादा सपकाळ गुरुवार, दि. 19 रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे गटाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा ते घेणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत .येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शिंदे शिवसेना गटाचे आग आम्ही वाटचाल याविषयी दगडू दादा सपकाळ कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. बैठकीस सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार तसेच जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा समन्वयक, उपजिल्हाप्रमुख, विधानसभाप्रमुख, विधानसभासंघटक, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, तालुका संघटक, उपशहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख तसेच महिला आघाडी, युवासेना आणि कामगार सेनेचे पदाधिकारी व शासकीय समिती सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बैठक गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, सातारा येथे होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख श्री. रणजितसिंह भोसले यांनी दिली.