01:40pm | Oct 05, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये खाजगी फायनान्स कंपनीचा कारभार बेफाम झाला असून यावर कोणताही शासकीय प्रतिबंध नाही. हा मनमानी कारभार तातडीने थांबवावा अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे. याचे निवेदन त्यांनी शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर केले.
या निवेदनात नमूद आहे की खाजगी सावकारी पेक्षाही अत्यंत वाईट पद्धतीने खाजगी फायनान्स कंपन्यांची वसुली सुरू आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना वसुलीसाठी पाठवणे, मोठया आवाजात भाषेत वयोवृद्ध महिला व्यक्ती धमकावणे, मोठ्याने गोंधळ करत कर्जदार व्यक्तीची बदनामी करणे, खातेदाराचा चेक वारंवार बाउन्स करून त्याला प्रमाणापेक्षा जास्त दंड लावणे, मोठ्या चार चाकी गाड्या पाठलाग करून ताब्यात घेणे, यासारखे विचित्र प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहे. सातारा तालुक्यात खाजगी कंपनीच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून एका मागासवर्गीय समाजातील महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या खाजगी कंपन्यांच्या मनमानी कारभारावर कोणाचाही वचक नाही याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अन्यथा या फायनान्स कंपन्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल असे निवेदनात नमूद आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह सागर रायते, रुपेश वंजारी, शिवराज टोणपे, रविंद्र भंडगे, हरि पवार, इम्रान बागवान, किशोर घोरपडे, राहुल मोहिते, संतोष किर्दत इत्यादी उपस्थित होते.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |